Monday, January 14, 2008

शिवजयंतीचा वाद

महाराष्ट्रात काही कुटील लोक व राजकारण्यांनी शिवजयंतीचा वाद मुद्दाम चिघळता आहे।आजही शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांच्या २-२ जयंत्या साजऱ्या केल्या जाव्यात यासारखा शिवरायांचा दुसरा अपमान तो कोणता? (याशिवाय महाराष्ट्रात शिवजयंती टिळकांनी सुरू केली असाही एक गोड गैरसमज आहे।पण टिळक जेव्हा खरोखरच बाळ होते तेव्हा १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवरायंची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जिवनावर एक प्रदिर्घ पोवाडा रचला. शिवरायांचे कार्य घरोघर पोहचावे यासाठी त्यांनी १८७० साली शिवजयंती सुरू केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुण्यात पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात सुरू झाली.) असो, सध्याचा प्रश्न शिवजयंतीच्या वादाचा आहे.हा वाद संपाव म्हणून महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा. सी. बेंद्रे, न. र. फाटक, ग. ह.खरे, द. वा. पोतदार, डॉ. अप्पासाहेब पवार, ब.मो.पुरंदरे यांची एक समीती स्थापन केली. शिवजयंतीची तारीख निश्चित करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले. ज्या कामाला २-३ वर्ष लागतात तेथे त्यांनी ३०-३३ वर्ष लागले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता‌. शेवटी त्यांनी १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारिख शासनाल सादर केली. १९ फ़ेब्रुवारी ही तारिख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करावी असे आवाहन केले.त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या.त्यांनी तिथीचा आग्रह धरतच पुरंदरे, बेडेकर, मेहेंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्रे दिली. शासनाच्या समितीत असणारे तथाकथीत शिवशाहीर तिथीच्या कळपात घुसले. शिवजयंतीचा वाद हा कोणत्याही राजकीय पक्षाने सुरू केला नाही, पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी त्या नंतर राजकीय स्वरूप देण्यात आले. यामागे षड् यंत्र काय? या वादतून बहुजन समाजात दोन गट पडावेत, लढण्यातच त्यांची सर्व शक्ती नष्ट व्हावी, खऱ्या शिवचरित्राकडे त्यांचे लक्षच जाऊ नये असा हेतू नसू शकेल काय? जयंत साळगांवकरांना तिथीबद्दल एवढे प्रेम आहे तर मग ते आपले कॅलेंडर चैत्र महिण्यात बाजारात का आणत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे आणि तिथीचे आकडे लहान का टकतात? पण तिथीचा आग्रह धरल की पंचांग आलेच , मग़ साळ्गांवकरांसारख्यांचा रोजगार हमी धंदा आलाच . पंचांग वाचनाचा बिन भांडवली धंदा चालावा आणि खरे शिवभक्त वादातच संपावेत यासाठीच हे कारस्थान आहे. बहुजनांनी शिवजयंतीच्या वादचे हे मूळ जाणून आपसातील सर्व मतभेद विसरून सर्वांनी १९ फ़ेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी याचसाठी हा खटाटोप ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! शिवश्री

1 comment:

Ganesh D said...

Dear Mukesh, Jai Bhim.
Its a pleasure to see your blog here. I expect much more from you.
~Ganesh